काँग्रेसने अलीकडेच खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन केलं होतं. भारताचं दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ही पदयात्रा काढली होती. गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी ही पदयात्रा सुरू करण्यात आली होती. ‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसने आता देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘भारत जोडो यात्रा’ काढणार असल्याची घोषणा केली.

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदयात्रेचा पहिला टप्पा सुरू केला होता. त्याचा समारोप काश्मीरमध्ये झाला. दरम्यान, राहुल गांधींनी सुमारे १३० दिवसांहून अधिक काळ पायी प्रवास केला. ही पदयात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये

काँग्रेसचे जनरल सेक्रटरी के सी वेणुगोपाल यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ७ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत “भारत जोडो यात्रा” काढावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतचं परिपत्रकही जारी केलं आहे.

हेही वाचा- ट्रकने प्रवास करत राहुल गांधींनी जाणून घेतल्या चालकांच्या समस्या, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातपासून सुरू होऊन ईशान्येकडील राज्य मेघालयापर्यंत जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. राहुल गांधींची दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्यातील नेते त्या-त्या राज्यात समांतर पदयात्रा काढतील, असंही पटोले म्हणाले होते.

हेही वाचा- राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार; नाना पटोलेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही याआधी नोव्हेंबरपूर्वी गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील पासीघाटपर्यंत ‘भारत जोडो यात्रा’ काढली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती.