लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज (ता. ५ एप्रिल) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या जाहीरनाम्याची ‘ग्यान’ संकल्पना

काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा ‘ग्यान’ (GYAN) या संकल्पनेवर अधारीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी(G)- गरीब, वाय(Y)- युवा, ए (A)- अन्नदाता, एन (N)- नारी, अशी काँग्रेसची संकल्पना आहे.

हेही वाचा : मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?

तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन.
आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे आश्वासन.
सरकारी नोकऱ्यांमधील कत्रांटी धोरण रद्द करण्याचे आश्वासन.
विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये, म्हणून कायदा केला जाणार.
गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन.
शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपीचे आश्वासन.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास एका महिन्यात मदत मिळणार.
शेतकऱ्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्याचे आश्वासन.
असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणणार.
बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देण्याचे आश्वासन
अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासन
पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येणार.
गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचे आश्वासन
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party manifesto published in lok sabha election 2024 congress manifesto marathi news gkt