काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. ते उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज त्यांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला. शशी थरूर हेही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे सध्या तरी शशी थरूर यांच्या विरोधात दिग्विजय सिंह हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत दिसत आहेत.
AICC President Election : …तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला दिसेल – शशी थरूर
अध्यक्षपदासाठीची लढत ही तिरंगी होईल की दोघांमध्ये होईल? असे जेव्हा दिग्विजय सिंह यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहा, असं उत्तर दिलं. तसेच, आज मी इथे माझा उमदेवारी अर्ज घेण्यासाठी आलोय आणि उद्या अर्ज दाखल करणार आहे. असंही यावेली त्यांनी सांगितलं.
याशिवाय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या गोंधळात आता प्रियंका गांधी यांना पक्षप्रमुख करण्याची मागणी समोर येत आहे. आसाममधील काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. खालिक यांनी युक्तिवाद केला आहे की, ”प्रियंका या सध्या वाड्रा कुटुंबाची सून असल्याने भारतीय परंपरेनुसार त्या गांधी कुटुंबाच्या सदस्य आहेत, असे म्हणता येणार नाही.”
“राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास नकार दर्शवल्याने मी प्रियंका यांना अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार मानतो. कारण, त्या आता वाड्रा कुटुंबाच्या सून असल्याने, भारतीय परंपरेनुसार गांधी कुटुंबाच्या सदस्य नाहीत.” असं बारपेटा येथील काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी म्हटलं आहे.
१७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार –
काँग्रसेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मतदान करती