काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार असणारे मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधानदाची उमेदवारी घेणार का? असं विचारलं असता खरगेंनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळलं. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्यासंबंधी निर्णय घेऊ असं खरगेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मध्य प्रदेशात पक्षातील अंतर्गत निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून तुम्ही राहुल गांधींविरोधात उभे राहणार का? असं विचारलं असता त्यांनी यावर सध्या भाष्य करणं फार घाईचं होईल असं स्पष्ट सांगितलं.

“मी मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचलोय,” थरुर यांच्यासंबंधी विचारताच खरगे स्पष्ट बोलले, म्हणाले “त्यांच्याशी माझी तुलना…”

ते म्हणाले “आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडू देत. बकरी ईदला वाचलो तर मोहरमला नाचू अशी एक म्हण आहे. आधी आमचं मतदान होऊ देत, मला अध्यक्ष होऊ द्या, त्यानंतर आपण यासंबंधी बोलू”. आपणच काँग्रेसचे अध्यक्ष होऊ याचा खरगेंना विश्वास आहे. यानिमित्ताने २० वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.

भाजपाकडून टीका

मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘मोहरम’चा उल्लेख करत केलेल्या विधानावर भाजपाने टीका केली आहे. ‘मोहरम’ची खिल्ली उडवण्यात आल्याने भाजपाने संताप व्यक्त केला आहे. “मोहरम हा उत्सव नसून शोक आहे. हा मुस्लिमांचा मोठा अपमान आहे,” असं भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी म्हटलं आहे.

शेहजाद पुनावाला यांनी ट्विटरला खरगेंचा व्हिडीओ शेअऱ केला आहे. यामध्ये त्यांनी खरगेंचा उल्लेख गांधी कुटुंबाचे प्रॉक्सी उमेदवार असा केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ पोस्ट केला असून हे फार आक्षेपार्ह विधान असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president election mallikarjun kharge pm candidate rahul gandhi bakri eid muharram sgy
Show comments