Mallikarjun Kharge Mocks Yogi Adityanath: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचाराचा हा शेवटचा आठवडा असून २० तारखेला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कधी ते राज्यातील नेत्यांबाबत असतात तर कधी केंद्रीय नेतृत्वाबाबत. नुकत्याच विरोधकांच्या मुंबईत पार पडलेल्या ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांच्यावर मिश्किल भाष्य करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. त्यावर भाजपानंही प्रत्युत्तर दिल्यामुळे यावरून दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

संविधान बचाव संमेलनाच्या निमित्ताने मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत आले होते. त्यांनी या संमेलनात केलेल्या भाषणातून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत अशा लोकांनी एकतर पांढरे कपडे घालावेत किंवा राजकारण सोडावं असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

“एक कुणीतरी नेते साधूच्या वेशात राहतात. पण चांगले राजकारणी झाले आहेत. मुख्यमंत्रीही झाले आहेत. ते भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. डोक्यावर केसही ठेवत नाहीत. असे एक नेते आहेत, ज्यांना भाजपानं जन्माला घातलं आहे. ठीक आहे. आम्हाला त्याबाबत काही तक्रार नाही. माझं भाजपाला एवढंच म्हणणं आहे की एकतर त्यांना पांढरे कपडे परिधान करायला लावा. पण जर तुम्ही संन्याशांसारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल तर मग राजकारणातून बाहेर व्हा”, असं खर्गे म्हणाले.

“तुम्ही भगवे कपडे परिधान करून राजकारणी होणार असाल तर मग त्या कपड्यांचं पावित्र्य काय राहिलं? एकीकडे तुम्ही भगव्या रंगाचे कपडे परिधान करता आणि दुसऱ्यांवर टीका करता. बटेंगे तो कटेंगे म्हणता. मग संन्याशासारखे कपडे का परिधान करता? तुमचं काम आहे सगळ्यांना एकत्र करणं, जोडणं, सगळ्यांशी प्रेमाने बोलणं. हे आरामात मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात आणि गरीबांबद्दल बोलतात. लोकांमध्ये विष पसरवण्याचं, तोडण्याचं काण करत आहेत. त्यामुळे यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे”, असं खर्गे म्हणाले.

Mallikajun Kharge: ‘बांटना और काटना’ हे भाजपचे काम – खरगे

“..तर संविधानाची जागा मनुस्मृती घेईल”

दरम्यान, यावेळी खर्गेंनी संविधानाऐवजी मनुस्मृती येण्याची भीती व्यक्त केली. “मी आवाहन करतो की अशा लोकांना निवडणुकीत पराभूत करून जर घरात बसवलं नाही तर आपल्या संविधानाच्या ठिकाणी मनुस्मृती येईल आणि हे त्याचे महंत बनून बसतील”, असं विधान खर्गे यांनी केलं आहे.

“हे मौलवींबाबत का म्हणत नाही?” भाजपाचा प्रतिप्रश्न

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गेंच्या या टीकेवर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. कपड्यांचा विषय असेल तर खर्गे मौलवींबाबत का बोलत नाहीत? असा मुद्दा भाजपानं उपस्थित केला आहे. “हा काँग्रेसचा खरा डीएनए आहे. तो हिंदूविरोधी आणि सनातन विरोधी आहे. आता काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं आहे की जे कुणी भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात, त्यांनी राजकारणात येऊ नये. पण मग हीच बाब ते मौलाना आणि मौलवींबाबत म्हणतात का? याच काँग्रेसनं भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे शब्द वापरले होते. पण ते हे इतर धर्मांबाबत म्हणत नाहीत. ही काँग्रेसची जातीयवादी विचारसरणी आहे. त्यांना बटेंगे तो कटेंगे जातीयवादी वाटतंय आणि वोट जिहाद धर्मनिरपेक्ष वाटतंय. त्यामुळेच ते अशी विधानं करत आहेत”, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केली आहे.

Story img Loader