G20 Summit Delhi 2023 : ‘जी-२०’ समूहाच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेला आज ( ९ सप्टेंबर ) सुरूवात होत आहे. या बैठकीत ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख दाखल झाले आहेत. जी-२० परिषदेनिमित्त नवी दिल्ली उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रमुखांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. पण, डिनरला काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं नाही. यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदी सरकारला सुनावलं आहे. “मी आणि काँग्रेस पक्षाकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे चांगलं राजकारण नाही. केंद्र सरकारने खालच्या दर्जाचं राजकारण करू नये,” असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Sanjay Shirsat On Sujay Vikhe Patil
Sanjay Shirsat : “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान”, सुजय विखेंच्या विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
Modi Govt faces criticism for handling economic crisis
“नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या जुमलांपेक्षा…” देशाच्या आर्थिक स्थितीवरून खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका

हेही वाचा : G20 Summit: अदानी-अंबानींनाही मोदी सरकारचं डिनरसाठी आमंत्रण? तर्क-वितर्कांना उधाण; नेमकं सत्य काय?

काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनीही बेल्जियमधून मोदी सरकारवर टीका केली आहे. “६० टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी पक्षांना सरकार महत्व देत नाही. याचा हा पुरावा आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
“विरोधी पक्षाचा द्वेष करत आहात.”

हेही वाचा : जी २० परिषदेतील पंतप्रधानांसमोरील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण वाचा!

याप्रकरणावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राजाचे मन छोटे असेल, तर असं होतं. माजी पंतप्रधान देवगौडा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डिनरचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाहीत. पण, देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. तुम्ही त्यांना बोलावत नाही, यावरून तुमच्या मनात भीती असल्याचं स्पष्ट होते. राज्यकर्त्यांचं मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात, हे चुकीचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

Story img Loader