मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मोरेना येथे निवडणूक सभा होत आहे. या सभेला सुरुवात झाली असून राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची नक्कल करुन दाखवली. नक्कल करण्याचा प्रयत्न करताना यातून राहुल गांधींनी मोदींवर तोफ डागली.

राहुल गांधी मोदींची नक्कल करताना म्हणाले, मोदी म्हणतात मित्रो मला पंतप्रधान बनवू नका मला चौकीदार बनवा… पण माझा प्रश्न हा आहे की, हा चौकीदार जनतेला मित्रो म्हणतो मात्र अनिल अंबानी, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना भाई म्हणून संबोधतो असं का?

दरम्यान, मोदी सरकारमधील खासदार एम. जे. अकबर यांच्यासह यापूर्वी अनेक नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यावरुन राहुल गांधी यांनी शेओपूर जिल्ह्यातील सभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मोदी सरकारने सुरु केलेली मोहिम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ बदलून ती ‘बेटी पढाओ, बेटी भाजपाच्या गुंडांपासून, नेत्यांपासून, आमदार-खासदारांपासून बचाओ’ अशी चालवायला हवी.

Story img Loader