पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मणिपूर सतत धगधगते राहण्यात भाजपचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केला. मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी राजधर्माचे पालन करत नसून या राज्यघटनात्मक दोषातून त्यांची सुटका होऊ शकत नाही, अशी टीका काँग्रेसने केली.

खरगे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘‘भाजप ही मणिपूर जाळणारी आगकाडी आहे!’’ नरेंद्र मोदींना उद्देशून काँग्रेस अध्यक्षांनी लिहिले आहे की, तुम्ही मणिपूरला अखेरचे जानेवारी २०२२मध्ये भाजपला मते मागण्यासाठी गेला होता. त्या राज्यामध्ये मे २०२३मध्ये हिंसाचार उसळला. ६००पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. उपग्रहांनी पाठवलेल्या प्रतिमांमधून आता असे उघड झाले आहे की, एकामागोमाग एक गावे राज्यातून नाहीशी झाली आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक जखमी झाले, त्याचा उल्लेख करून तेथील भाजपचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यावरही खरगे यांनी जोरदार टीका केली. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही राज्यातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती याचे स्मरण करून दिले.

राज्यपालांकडून सुरक्षेचा आढावा

मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), आसाम रायफल्स यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, पोलीस महासंचालक राजीव सिंग, आयजीएआर (दक्षिण) मेजर जनरल रावरूप सिंग आणि सीआरपीएफ, बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आम्ही संपूर्ण जबाबदारीने याचा पुनरुच्चार करत आहोत की, सीमेवरील हे सुंदर राज्य धगधगते ठेवण्यात भाजपचे काही हितसंबंध गुंतलेले आहेत. तिथे २५०पेक्षा जास्त निरपराध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि ६० हजार विस्थापित झाले आहेत. २० महिन्यांनंतरही लोक अजूनही शिबिरांमध्ये राहत आहेत.– मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस