विशिष्ट तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा सोमवारी (४ ऑक्टोबर) रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी खंडित झाली होती. खरंतर, अनेक तासांसाठी ठप्प झालेल्या सेवेमुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना आणि चर्चांना उधाण आलं. नेमके हे अॅप्स अचानक बंद कसे काय झाले? याबाबत चर्चा झडू लागल्या, त्याचसोबत अनेक विनोदही केले गेले. मात्र, देशात आता याला राजकीय वळण मिळताना पाहायला मिळत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं. प्रियंका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीचं फेसबुक-व्हॉट्सअॅप बंद करण्यात आल्याच्या मोठ्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. अगदी कॉंग्रेसच्या खासदारांपासून ते ‘आप’च्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच हा दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा