पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधन दरवाढ होईल असं सांगितलं जात होतं. या निवडणुका पार पडल्यानंतर देखील काही काळ किमती स्थिर राहिल्यानंतर आता रशिया-युक्रेनमधील परिस्थिती चिघळत असताना मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ होऊ लागली आहे. आज राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ८४ आणि ८३ पैशांनी वाढल्या आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ११२ रुपये प्रतिडॉलर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंधन दरवाढीचा भडका!

IOCL च्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.

या पार्श्वभूमीवर देशातील वाढत्या महागाईबाबत राहुल गांधींनी मोदींवर लॉकडाऊन, विकास आणि थाली बजाओ शब्दांचा वापर करून खोचक टोला लगावला आहे. “गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागलेला ‘लॉकडाऊन’ हटला आहे. आता सरकार सातत्याने किमतींचा विकास करेल. महागाईविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं, तर ते म्हणतील ‘थाली बजाओ’!” असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.

महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचा दर काय?

दिल्ली
पेट्रोल- 96.21 रुपये प्रतीलिटर
डिझेल – ८७.४७ रुपये प्रतीलिटर

मुंबई
पेट्रोल- ११०.८२ रुपये प्रतीलिटर
डिझेल – ९५ रुपये प्रतीलिटर

चेन्नई
पेट्रोल- १०२.१६ रुपये प्रतीलिटर
डिझेल – ९२.१९ रुपये प्रतीलिटर

कोलकाता
पेट्रोल- १०५.५१ रुपये प्रतीलिटर
डिझेल – ९०.६२ रुपये प्रतीलिटर