पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त ‘पीटीआय’ने दिलं आहे. आईची प्रकृती बिघडली असल्याने नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून हिराबेन मोदी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींचं ट्वीट –
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “एका आई आणि मुलामधील प्रेम शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीणप्रसंगी माझं प्रेम आणि समर्थन तुमच्यासह आहे. तुमच्या आईची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी आशा व्यक्त करतो”.
याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. हिराबेन यांनी निवडणुकीसाठी मतदानही केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात दाखल; मोदी अहमदाबादला जाण्याची शक्यता
हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला आहे. त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.