भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याच्या आरोप भाजपाने केला आहे. मात्र, काँग्रेसकडून या आरोपाचे खंडण करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील एका परिषदेदरम्यान मिर्झा आणि अन्सारी एकाच मंचावर असल्याच्या फोटोचा हवाला देत भाजपाने स्पष्टीकरण मागितले आहे.

ऑल इंडिया बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आदिश अग्रवाल यांनी हमीद अन्सारी यांच्याबाबत नवा खुलासा केला आहे. २७ ऑक्टोबर २००९ रोजी दहशतवाद विषयावर दिल्लीतील ऑबेरॉय हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात हमीद अन्सारी, दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि इतर मुस्लिम नेते उपस्थित होते. जामा मशीद युनायटेड फोरमच्या परिषदेत हमीद अन्सारी आणि त्याचे मित्र पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांच्याशी मैत्री करत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.

हमीद अन्सारीच्या निमंत्रणावरून भारताला भेट दिली असल्याचा दावा

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी दावा केला आहे की, यूपीए सरकारच्या काळात आपण पाच वेळा भारताला भेट दिली होती आणि येथे गोळा केलेली संवेदनशील माहिती आपल्या देशाची गुप्तचर संस्था आयएसआयला दिली होती. मी हमीद अन्सारीच्या निमंत्रणावरुन भारताला भेट दिली होती आणि त्यांची भेटही घेतली असल्याचेही मिर्झा यांनी स्पष्ट केले आहे.

अन्सारींकडून आरोपाचे खंडण

अन्सारी यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. नुसरत मिर्झा नावाच्या पत्रकाराला आपण कधीही भेटलो नाही किंवा निमंत्रित केले नसल्याचे स्पष्टीकरण अन्सारी यांनी दिले आहे. यापूर्वी, हमीद अन्सारी यांनी अनेक “संवेदनशील आणि अत्यंत गोपनीय” माहिती त्यांच्यासोबत शेअर केल्याच्या नुसरत मिर्झाच्या दाव्याचा हवाला देऊन भाजपाने अन्सारी यांच्यावर टीका केली होती. अन्सारी यांनी ISI साठी हेरगिरी केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला भारतात आमंत्रित केले असल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात आला होता.

Story img Loader