Congress Manifesto For Delhi Vidhansabha Elections 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये नोकरी आणि शिक्षणात ट्रान्सजेंडरसाठी आरक्षण, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, महिलांना मासिक २५०० रुपये मानधन आणि जातीय जनगणना यासह अनेक आश्वासनांची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील सर्व रहिवाशांसाठी २५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य कव्हरेज, बेरोजगार तरुणांना ८ हजार ५०० रुपये स्टायपेंडसह एक वर्षाची शिकाऊ शिष्यवृत्ती, ५०० रुपये प्रति सिलिंडर दराने स्वयंपाकाचा गॅस, मोफत रेशन किट आणि स्वतंत्र मंत्रालय अशी इतर महत्त्वाची आश्वासने देण्यात आली आहेत.

लाडकी बहीण योजना दिल्लीतही

AAP च्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि भाजपाच्या महिला समृद्धी योजनेप्रमाणेच काँग्रेसने आपल्या प्यारी दीदी योजनेची घोषणा केली. ज्या अंतर्गत पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब घरातील एका महिलेला दरमहा अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत.

सिलिंडर मिळणार ५०० रुपयांत

महागाईमुक्ती योजनेंतर्गत, “आम्ही ५०० रुपये प्रति सिलिंडर दराने स्वयंपाकाचा गॅस आणि ५ किलो तांदूळ, २ किलो साखर, १ किलो स्वयंपाकाचे तेल, ६ किलो डाळ आणि २५० ग्रॅम चहाचा समावेश असलेले मोफत रेशन किट देऊ”, असं जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

काँग्रेसने ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग व्यक्ती, ट्रान्सजेंडर आणि निराधार व्यक्तींसाठी दरमहा पाच हजार रुपये नवीन पेन्शन योजनेचे आश्वासन दिले. तरुणांसाठी, जाहीरनाम्यात खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी देण्याचे वचन दिले आहे आणि त्याच्या कालावधीसाठी प्रति महिना साडेआठ हजार स्टायपेंड जाहीर करण्यात आला आहे. विविध वंचित वर्गांची गणना करण्यासाठी दिल्ली जात सर्वेक्षण राज्य सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केले जाईल. पक्षाने क्रीमी लेयर निश्चित करण्यासाठी उत्पन्न मर्यादा प्रति वर्ष १२ लाख रुपये करण्याचे वचन दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress released manifesto for delhi vidhansabha elections 2025 sgk