भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. छत्तीसगड वगळता इतर चार राज्यांची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. तर, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या पाच राज्यांमधील वेगवेगळे पक्ष कामाला लागले असून अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने आज (१५ ऑक्टोबर) सकाळी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसने मध्य प्रदेशमधील १४४, छत्तीसगडमधील ३० आणि तेलंगणा विधासभा निवडणुकीसाठीच्या ५५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आधीच जाहीर केलं होतं की, नवरात्रोत्सवाआधी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार आज घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली.

Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
ballarpur assembly, abhilasha gavture, sudhir mungantiwar, santosh singh ravat,
गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड
chimur vidhan sabha constituency kirtikumar bunty bhangdiya vs congress satish warjukar
चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत

या यादीनुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ त्यांचा विद्यमान मतदारसंघ छिंदवाडा येथून निवडणूक लढतील. ही यादी जाहीर करताना काँग्रेसने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे, “सर्वांना आगामी निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा. बढाए हाथ, फिर कमलनाथ.”

काँग्रेसने छत्तीसगडमधील पहिल्या ३० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल हे त्यांचा विद्यमान मतदारसंघ पाटणमधून निवडणूक लढतील. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत.

काँग्रेसने तेलंगणातील ५५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागा आहेत. तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी हे कोडगनल या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

हे ही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांच्या संस्थेने मराठा आरक्षणाविरोधात…”, माजी आमदाराचा गंभीर आरोप

काँग्रेसने पहिल्या टप्प्यात तीन राज्यांमधील २२९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने केवळ एकेक मुस्लीम उमदवार उभा केला आहे. तर तेलंगणात तीन मुस्लीम उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे.