रेल्वेच्या मागासलेपणासाठी कॉंग्रेस पक्षच जबाबदार असून, अधिक काळ सत्तेवर राहिल्यानंतरही या पक्षाला रेल्वेच्या विकासासाठी पावले उचलता आली नाहीत, असे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
कॉंग्रेसने रेल्वेचा विकास करण्यासाठी आवश्यक गुंतवणूक न केल्यामुळेच देशाची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा विकास रखडला, असा आरोपही प्रभू यांनी केला आहे. बालिया-चापरा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला प्रभू यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. कॉंग्रेसने रेल्वेच्या आधुनिकतेकडे दुर्लक्ष केल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात रेल्वे मार्गाचे मोठय़ा प्रमाणात दुपदरीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.

Story img Loader