लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलासमवेत (राजद) युतीची शक्यता असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले असून त्यांच्या या बचावाची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खिल्ली उडविली आहे.
राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि त्यांची कृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे राजदशी युती करण्याची शक्यता जनतेच्याही पचनी पडणार नाही, असे नितीशकुमार यांनी सांगितले. काँग्रेस आणि राजदची युती नैसर्गिक आहे, राजद पक्ष यूपीए-१मध्ये सहभागी होते तर यूपीए-२ला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोघांमध्ये निवडणूकपूर्व युती झाली नाही तरच आपल्याला नवल वाटेल, असेही नितीशकुमार म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडण्याचे नाटक केले असा आरोप केला.काँग्रेस पक्ष १९८४ चे शीखविरोधी दंगे तर ८९ च्या भागलपूर दंगलीला जबाबदार असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला. तर भाजप २००२ च्या गुजरात दंग्यांना जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान संयुक्त जनता दलाच्या वतीने राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या रामनाथ ठाकूर, कहकाश परवीन आणि हरिबंश यांनी मंगळवारी बिहारमधून उमेदवारी अर्ज भरले आहेत़  मुख्यमंत्री नितीश कुमार  या वेळी त्यांच्यासोबत होत़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा