भाजप सरकार अल्पसंख्यांक आणि दलितांना धमकावत असल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे.  संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना देशातील प्रत्येकाला धडा शिकवायचा असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरद्वारे केली आहे. तर काँग्रेस प्रवक्ते रणदिप सिंह सुरजेवाला यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी देखील पर्रिकरांवर निशाणा साधला आहे. पर्रिकरांनी पुण्यातील कार्यक्रमात अामिर खान विरोधी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. देशवासियाविरोधी वक्तव्य करण्यावर भाष्य करण्यापेक्षा संरक्षणमंत्र्यांनी आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणे करावे, असे त्यांनी म्हटले आहे. रणदिप सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून पर्रिकरांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पर्रिकरांचे काम भारताला पाकिस्तानसारख्या देशाकडून होणाऱ्या अघोऱ्या कृत्यापासून बचाव करण्याचे असल्याचा सल्ला देखील दिला आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारत शक्ती डॉट कॉमतफे संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांच्या ‘बियाँड एन.जे. ९८४२ : द सियाचीन सागा’ या पुस्तकाच्या ‘सियाचिनचे धगधगते हिमकुंड’ या मराठी अनुवादाचे प्रकाशन पर्रिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी देश विरोधी भाष्य करणाऱ्याला योग्य धडा शिकावयला हवा, असा टोला अमिर खानचे नाव न घेता त्यांनी लगावला होता. पर्रिकरांच्या या विधानाला उचलून धरत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.