कोळसा खाणवाटप घोटाळ्यामुळे काँग्रेसवर काळ्या धुराची पुटे चढली आहेत. त्याचे डाग सत्ताधारी पक्षावर आहेत अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशात केली होती, पण नरेंद्र मोदी यांचे हात गोध्रा हत्याकांडामुळे लाल झालेले आहेत असे परखड उत्तर परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदी यांच्या वक्तव्यावर दिले आहे. कोळसा घोटाळ्यात हात असल्याने पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची मागणीही काँग्रेसने फेटाळली आहे.
खुर्शीद यांनी सांगितले की, काँग्रेसचे हात लोकांची सेवा करून काळे झाले असतीलही पण मोदी यांचे हात नेमकी कुणाची सेवा केल्याने लाल झाले आहेत ते त्यांनी सांगून टाकावे, असा टोमणाही खुर्शीद यांनी मारला. कानपूर येथील सभेत मोदी यांनी कोळसा घोटाळ्याबाबत टीका करताना असे म्हटले होते की, कोळशाचा धूर दिल्लीतून निघत आहे पण त्याचे प्रदूषण कानपूपर्यंत आले आहे. कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल हे कानपूरचे खासदार आहेत.
दरम्यान जनता दल संयुक्तने कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याची मागणी केली असून ती सर्व प्रक्रियाच संशयास्पद होती असे म्हटले आहे. यात मोठे भांडवलदार व राजकीय नेत्यांना फायदा झाला असून या सगळ्या प्रकाराची ताबडतोबीने चौकशी करावी असे जनता दल संयुक्तचे प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी म्हटले आहे.
तुमचे हात लाल कशाने झाले ते सांगा- खुर्शीद
कोळसा खाणवाटप घोटाळ्यामुळे काँग्रेसवर काळ्या धुराची पुटे चढली आहेत. त्याचे डाग सत्ताधारी पक्षावर आहेत अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे
First published on: 21-10-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress slams narendra modi for remark on coal scam say his hands are red referring to godhra riots