२००९ मध्ये गुजरातमधील एका वास्तुरचनाकार महिलेवर पाळत ठेवल्याचा ‘कोब्रा पोस्ट’च्या आरोपानंतर काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. या महिलेला तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून सुरक्षा पुरवली, असा दावा भाजप करत आहे, तर मग तिला सुरक्षा अधिकारी का दिला नाही, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे.  मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांनी ‘साहेबांच्या’ आदेशावरून या महिलेवर पाळत ठेवण्यास सांगितले होते, असा दावा ‘कोब्रा पोस्ट’ व ‘गुलेल’ या दोन पोर्टलनी केला होता. त्यांनी शहा व आयपीएस अधिकारी यांच्या संवादाच्या टेप उघड केल्या असून त्याची शहानिशा झालेली नाही.