उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, बसपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जास्तीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पक्ष विविध प्रकारे प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील मैदानात उतरल्या असून, त्या उत्तर प्रदेशमधील गावं आणि शहरांमधून तब्बल १२ हजार किलोमीटरची यात्रा करणार आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या तयारीचा प्रियंका गांधी आपल्या दोन दिवसीय लखनऊ दौऱ्यात आढावा घेत आहेत. शिवाय, निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा देखील करत आहेत.
Congress under the leadership of its national general secretary Priyanka Gandhi Vadra to take out 12,000 km-long yatra through villages and towns of Uttar Pradesh ahead of 2022 assembly polls
— Press Trust of India (@PTI_News) September 10, 2021
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी १२ हजार किलोमीटरची ‘हम वचन निभाएंगे’ ही प्रतिज्ञा यात्रा काढली जाईल. यामुळे पक्ष प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊ शकेल. ही यात्रा उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मोठं गाव व खेड्यांमधून जाईल. या यात्रेची रुपरेषा देखील निश्चित केली गेली आहे. आता यात्रेचा नेमका मार्ग कसा असेल आणि अन्य मुद्य्यांवर चर्चा केली जात आहे.