वर्धमान : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फारच कमी उमेदवार जिंकून येणार आहेत. काँग्रेसच्या जागा ‘सार्वकालिक नीचांकी’ असतील. निवडणुकीतील प्रचार पाहता हा सर्वात जुना पक्ष अर्धशतकही पार करण्यास धडपडत असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूर आणि कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील सभांना संबोधित करताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. केरळमधील वायनाडमध्ये पराभव जाणवत असल्याने उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला, असे सांगून मोदी यांनी राहुल यांच्या रायबरेलीतील उमेदवारीची खिल्ली उडविली. राहुल गांधी व काँग्रेसवर पळपुटेपणाचा आरोप केला. काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास ते अनुसूचित जाती, दलित आणि ओबीसींसाठी असलेले आरक्षण हिसकावून घेतील आणि ते ‘जिहादी मतपेढी’ला देईल. ‘इंडिया’ आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने ‘व्होट जिहाद’ अशी टिपप्णी केली आणि त्याला काँग्रेसचे समर्थन आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

हेही वाचा >>> अटकेचे तपशील द्या! ‘जीएसटी’अंतर्गत केलेल्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आपली राज्यघटना स्पष्ट सांगते की भारत सरकारने धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये. मात्र काँग्रेसला तेच करायचे आहे. कारण ओबीसी, दलित आणि आदिवासी मोदींना पाठिंबा देत असल्याने काँग्रेस त्यांच्यावर नाराज आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेस राज्यघटनेत दुरुस्ती करणार नाही, असे लेखी निवेदन द्यावे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान