लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री हरिश रावत हे धारचुला मतदारसंघातून विजयी झाले असून दोईवाला आणि सोमेश्वर या जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीतील या विजयामुळे देशातील मोदी लाट ओसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुख्यमंत्री हरिश रावत हे २० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत, तर दोईवाला मतदारसंघातून काँग्रेसचे हिरासिंग बिश्त सहा हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सोमेश्वर (राखीव) ही जागा काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी नऊ हजारांहून अधिक मताधिक्याने जिंकली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून सर्व जागांवर पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला या विजयामुळे दिलासा मिळाला आहे.
उत्तराखंड पोटनिवडणुकीत काँग्रेसची मुसंडी
लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.
First published on: 26-07-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress wins all 3 seats in uttarakhand by polls