लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री हरिश रावत हे धारचुला मतदारसंघातून विजयी झाले असून दोईवाला आणि सोमेश्वर या जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीतील या विजयामुळे देशातील मोदी लाट ओसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुख्यमंत्री हरिश रावत हे २० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत, तर दोईवाला मतदारसंघातून काँग्रेसचे हिरासिंग बिश्त सहा हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सोमेश्वर (राखीव) ही जागा काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी नऊ हजारांहून अधिक मताधिक्याने जिंकली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून सर्व जागांवर पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला या विजयामुळे दिलासा मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा