‘सतरंजी उचले’ कार्यकर्ते अशी उपमा राजकीय कार्यकर्त्यांना दिली जाते. नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अनेकदा टीका होत असते. नेत्यांची हुजरेगिरी करताना कार्यकर्ते कधी कधी भानही हरपून बसतात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे आले होते. यावेळी सिद्धरामय्या आपल्या पायातील बूट काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना बूट काढता येत नव्हते. यासाठी एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने स्वतःच्या हाताने त्यांचे बूट काढले. पण यावेळी कार्यकर्त्याच्या हाताता भारताचा राष्ट्रध्वज होता. ज्यामुळे आता काँग्रेसवर टीका होत आहे.

प्रकरण काय आहे?

आज गांधी जयंती असल्यामुळे सिद्धरामय्या हे बंगळुरू येथे पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांना मानवंदना देण्यात येणार होती. यासाठी सिद्धरामय्या पायातील बूट काढत होते. मात्र त्यांना बूट काढता येत नव्हते. यावेळी एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने सिद्धरामय्या यांना बूट काढण्यासाठी मदत केली.

हे वाचा >> सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल

मबात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त आंदराजंली व्यक्त करण्यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे नेते याठिकाणी आले होते.

भ्रष्टाचार प्रकरणामुळे सिद्धरामय्या अडचणीत

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हेगारी आरोपांवरील खटले दाखल झाले आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) भूखंड वाटप प्रकरणात सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय कारणांसाठी भाजप मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेस नेतृत्वाने केला होता.

या कारवाईनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “मी चौकशीला सामोरे जायला घाबरत नाही. कायद्याची लढाई लढण्यासाठी मी तयार आहे.”

Story img Loader