देशातला सर्वात मोठा महाठग सुकेश चंद्रशेखर याने नुकतंच जॅकलिनला एक पत्र लिहिलं होतं. त्याने आपलं प्रेम या पत्रातून व्यक्त केलं होतं. सुकेशचं लग्न आधीच झालं आहे. त्याची पत्नी साधीसुधी नाही. दाक्षिणात्य अभिनेत्री लीना मारिया पॉलसोबत त्याने लग्न केलं आहे. लीनालाही सुकेशने आधी मैत्रीच्या जाळ्यात ओढलं मग प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केलं. जॅकलिन फर्नांडिसलाही त्याने असंच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तसंच जॅकलिनला त्याने कोट्यवधींच्या भेटीही दिल्या.जॅकलिन मात्र मी पीडित आहे असं आता चौकशीच्या दरम्यान सांगते आहे.
कोण आहे लीना मारिया पॉल?
लीना मारिया पॉल ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. दुबईत शिक्षण घेतल्यानंतर ती भारतात परतली. सुरूवातीला तिने मॉडेलिंग सुरू केलं. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली. याच दरम्यान तिची ओळख सुकेश चंद्रशेखरशी तिची ओळख झाली मग मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांनी असा खेळ केला की काही राज्यांचे पोलीस या दोघांच्या मागे लागले. सुकेश चंद्रशेखर गुन्हेगार आहे आणि त्याची पत्नी लीना ही त्याची क्राइम पार्टनर
लीना मारिया आहे सुकेशची क्राइम पार्टनर
लीना मारियाने सुकेशसोबत आधी लग्न केलं. त्यानंतर ती त्याचाई क्राइम पार्टनरही झाली. लीना मारिया पॉल दिसायला खूपच सुंदर आहे. याच सौंदर्याचा फायदा घेऊन त्यांनी फसवणुकीचा खेळ सुरू केला. सुकेशने लीनाला काही मॉडेलिंगचे प्रोजेक्टही मिळवून दिले होते. लोकांना टोप्या घालण्यात सुकेश चंद्रशेखर पटाइत होताच. याच जाळ्यात त्याने लीनालाही ओढलं.
लीनाला टॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये ऑफर मिळाली. त्यामुळे ती लवकरच टॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. लीनाला सिनेमांमधून प्रसिद्धी मिळत असतानाच तिला सुकेशचं वास्तव समजलं. सुकेश स्वतः आयएस ऑफिसर आहे असं सांगायचा त्यानंतर प्रोजेक्ट मंजूर करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळत होता किंवा तसेच बहाणे करून बँकेतून लोन घ्यायचा. या सगळ्या खेळात त्याने लीनालाही सहभागी करून घेतलं. तिलाही या खेळात मजा येऊ लागली.
दोघांनाही जावं लागलं तुरुंगात
सुरूवातीला लोकांना चुना लावून सुकेश आणि त्याची बायको लीना एकदम ऐशाआरामात जगले. मात्र या दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली. आता ते दोघे एकमेकांना भेटूही शकत नाहीत हे वास्तव आहे.
दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की सुकेश आणि लीना या दोघांनीही नेटफ्लिक्सवर ओजॉर्क नावाची एक वेबसीरिज पाहिली होती. त्यातून या दोघांना लोकांना विविध प्रकारे टोप्या कशा घालायच्या आणि गंडा कसा घालायचा हे दाखवण्यात आलं होतं. या दोघांनीही विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून काळा पैसा पांढरा करण्यासही सुरूवात केली होती.
सुकेश जॅकलिनच्या आयुष्यात कसा आला?
डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.
जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.
हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.यानंतर जॅकलिन आणि शेखर (सुकेश) यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे बोलणं वाढलं. या बोलण्यातून सुकेशने जॅकलिनला किती थापा मारल्या माहित नाही. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी माझं नातं आहे अशी थाप सुकेशने मारली होती.
जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.
हे पण वाचा- “तुझ्या आयुष्यातून हरवलेले रंग…” कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलं प्रेम पत्र
जॅकलिनवर भेटींचा वर्षाव
या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.