वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) कट होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी केला. ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांच्या कोठडीची मागणी करताना न्यायालयात केलेल्या अर्जात याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘पीएफआय’चे नेते आणि कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे. नागरिकांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करणे, अशांतता माजवण्यासाठी मने कलुषित करणे, देशाबाबत असंतोष निर्माण करणे आदी कारवाया ‘पीएफआय’ करीत असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

हेही वाचा >>> पाकिस्तानची भाषा शांततेची, पण मदत दहशतवाद्यांना; शाहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील वक्तव्याला भारताचे प्रत्युत्तर

The proposed Bill had proposed to change the composition of Waqf Boards in states. (Photo: X/jagdambikapalmp)
Waqf Borad : “वक्फ विधेयकामुळे मुस्लिमांचे हक्क कमकुवत होतील आणि…”, विरोधी पक्षातील सदस्यांची ‘त्या’ अहवालावर नाराजी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Image Of PM Narendra Modi, Home Minister Amit Shah An Former CM Uddhav Thackeray
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली
फडणवीस सरकारची जन्म दाखल्यांवर करडी नजर; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम (फोटो सौजन्य पीटीआय)
‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

हेही वाचा >>> शंकराचार्यपदी अविमुक्तेश्वरानंदांची निवड संन्यासी आखाडय़ांना अमान्य

‘पीएफआय’च्या  कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून या बाबी उघड झाल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे. छाप्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या उपकरणांची तपासणी करण्याची परवानगीही ‘एनआयए’ने मागितली आहे. ‘एनआयए’ने बुधवारी १५ राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून ‘पीएफआय’च्या १०६ पदाधिकारी- कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. 

हेही वाचा >>> उत्तराखंडमध्ये तरुणीच्या हत्येचे संतप्त पडसाद : ‘रिसॉर्ट’ला जमावाकडून आग; आरोपीचे वडील असलेल्या माजी मंत्र्याची भाजपमधून हकालपट्टी

विशिष्ट नेते ‘हिट लिस्ट’वर?

एका विशिष्ट समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ‘पीएफआय’ने यादी तयार केली असल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे. संघटनेचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या साथीदारांची मजल कुठपर्यंत गेली होती, हे यावरून स्पष्ट होते. अन्य धर्मीयांना दहशतीखाली ठेवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचा कट आखल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, असेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.

‘पीएफआय’ने पुकारलेल्या बंददरम्यान केरळमध्ये घडलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. या संघटित हिंसाचारात राज्याचे मोठे नुकसान झाले. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. 

– पी. विजयन, मुख्यमंत्री, केरळ

‘पीएफआय’वर बंदी घालण्यात यावी, असे माझ्या सरकारचे मत आहे. याबाबत आम्ही वारंवार केंद्राला विनंती केली आहे.

– हिमंता बिस्वशर्मा, मुख्यमंत्री, आसाम

हेही वाचा >>> पंजाबमध्ये विधानसभा अधिवेशनावरून राज्यपाल – मुख्यमंत्री वाद तीव्र

एनआयएचे आरोप..

  • ‘पीएफआय’ संघटनेकडून युवकांना लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांत सामील होण्यास प्रोत्साहन.
  • भारत आणि सरकारी यंत्रणांविरोधात द्वेष पसरवण्याचा ‘पीएफआय’चा प्रयत्न.  विशिष्ट नागरिकांसाठीच्या सरकारी धोरणांविरोधात चुकीची माहिती पसरवण्याच्या ‘पीएफआय’च्या कारवाया.
  • अटक केलेले पीएफआय कार्यकर्ते बेकायदा कारवाया, संघटित गुन्हेगारीत सामील. विशिष्ट समाजात दहशतीचा प्रयत्न.

हेही वाचा >>> आक्रमक चीनला ‘क्वाड’चा इशारा; हिंदू-प्रशांत क्षेत्राच्या स्थितीत एकतर्फी बदल नको

पुण्यात ‘पीएफआय’च्या ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा

पुणे : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या ‘पीएफआय’च्या ४१ कार्यकर्त्यांविरोधात बंडगार्डन पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ‘एनआयए’ने गेल्या गुरुवारी (२२ सप्टेंबर) कोंढवा भागात छापा टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

Story img Loader