मलेशियाच्या एमएच ३७० या बेपत्ता विमानातील प्रवासी वैमानिकाने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने गुदमरून मरण पावले व नंतर हे विमान हिंदी महासागरात पाडण्यात आले, असा दावा एका नवीन अहवालात करण्यात आला आहे.
हे विमान बेपत्ता होण्याच्या चार तास अगोदर या बोईंग ७७७ विमानातील लोक बेशुद्ध पडले व नंतर ते बेपत्ता झाले असे न्यूझीलंडचे हवाई अपघात तज्ज्ञ इवान विल्सन यांनी म्हटले आहे. ते किवी एअरलाइन्सचे संस्थापक आहेत. वैमानिकाने केबिनमधील दाब कमी केला. नेहमीप्रमाणे वरून ऑक्सिजन मास्क पडले पण त्यातील ऑक्सिजन २० मिनिटेच पुरला. काही जणांना मास्कही ओढता आला नाही कारण ते झोपेत होते. ते काही मिनिटांतच मरण पावले असावेत. नंतर सर्व कर्मचारीही कोमात गेले असावे, कारण त्यात ऑक्सिजन नव्हता, असे विल्सन म्हणाले. कॅप्टन शहा याने सहवैमानिकाला कॉकपीटच्या बाहेर ठेवले होते व तो थोडा जास्त काळ जगला असावा. नंतर विमान अलगदपणे समुद्रात पाडले असावे त्यामुळे विमान अखंडपणे तळाशी गेले असावे. सहवैमानिक फारिक अब्दुल हमीद याला यात दोषमुक्त ठरवले आहे.

Story img Loader