राज्यघटनेत काही कलमांमध्ये अल्पसंख्याक शब्दाचा वापर केला गेला असला तरी या शब्दाची नेमकी व्याख्या केलेली नाही, अशी कबुली अल्पसंख्याक व्यवहारविषयक राज्यमंत्री निनाँग एरिंग यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. घटनेच्या कलम २९ आणि ३० तसेच ३५० अ आणि ३५० ब मध्ये अल्पसंख्याक शब्द अनेक छटांसह आला आहे, असे त्यांनी नमूद केले. कलम २९ मध्ये दुर्मीळ भाषा बोलणारे वा लिपी लिहिणारे समाजगट, असा शब्द अल्पसंख्याक म्हणून येतो. प्रत्यक्षात बहुसंख्याक समाजातही असा गट असू शकतो, असे उत्तरात नमूद आहे.
आणखी वाचा