घटनात्मक संस्था असल्याने त्यावर टीका करायची नाही, या मताशी मी बिलकूल सहमत नसल्याचे भाजपचे नेते अरूण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर निवडणूक आयोगावर भाजपच्या नेत्यांनी आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचे त्यांनी समर्थन केले.
वाराणसीमधील एका जाहीरसभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. मोदी यांनी तर निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचे वक्तव्य जाहीर सभेत केले होते. यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आरोप फेटाळून लावत आयोग निःपक्षपातीपणे काम करीत असल्याचे म्हटले होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घटनात्मक संस्थांवर टीका करताना काळजी घ्यावी, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी यावेळी म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जेटली यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचे समर्थन केले.
ते म्हणाले, घटनात्मक संस्थांना त्यांच्यावर टीका करण्यापासून संरक्षण मिळाले आहे का, केवळ घटनात्मक संस्था आहे म्हणून त्याच्यावर टीका करायची नाही, या मताशी मी अजिबात सहमत नाही, असे जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.
निवडणूक आयोगाला टीकेपासून संरक्षण आहे का? – अरूण जेटली
घटनात्मक संस्था असल्याने त्यावर टीका करायची नाही, या मताशी मी बिलकूल सहमत नसल्याचे भाजपचे नेते अरूण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
First published on: 09-05-2014 at 01:09 IST
TOPICSअरूण जेटलीArun Jaitleyनिवडणूक आयोगElection Commissionलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitutional bodies have no immunity from criticism bjp