दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा हे विद्यापीठ चर्चेत आलं आहे. कारण विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवरील घोषणांमुळे विद्यापीठासह दिल्लीतलं वातावरण तापलं आहे. या घोषणांवरून सोशल मीडियावरही वाद सुरू झाले आहेत. विद्यापीठातील इमारतीच्या भिंतीवर ‘भगवा जलेगा’ आणि ‘फ्री काश्मीर’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. घोषणा लिहिलेल्या भिंतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, याप्रकरणी विद्यापीठाकडून अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
अशा प्रकारच्या वादांमुळे जेएनयू याआधीही चर्चेत आलं आहे. यावेळी विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवरील घोषणांमुळे वाद निर्माण झाला आहे. कारण विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवर ‘भगवा जलेगा’ आणि ‘फ्री काश्मीर’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घोषणांमुळे विद्यापीठातील वातावरण तापलं होतं. अशातच या घोषणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, विध्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. यापूर्वी जेएनयूमधील इमारतींच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया या जातींविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. ब्राह्मण कँपस छोडो, ब्राह्मण भारत छोडो, ब्राह्मण-बनिया, हम आपके लिये आर रहै हैं, हम बदला लेंगे, अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी याविरोधात आंदोलन केलं. भ्याड डाव्यांचं हे कृत्य आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने त्यावेळी केला होता.
हे ही वाचा >> १०० रुपयांची हातोडी, १३०० चं डिश कटर घेतलं अन् दागिन्यांचं शोरूम लुटलं, २५ कोटींच्या चोरीचं गूढ उकललं
तसेच याआधी दहशतवादी अफजल गुरूशी संबंधित आणि त्याचं समर्थन करणाऱ्या कथित घोषणांमुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ याआधी चर्चेत आलं होतं. सध्याच्या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे कृत्य कोणी केलंय याचा तपास केला जात आहे. विद्यापीठ प्रशासन याप्रकरणी तपास करत आहे.