अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाच्या प्रभावीपणाबद्दल देशातूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. मुंबई हल्ल्यातला आरोपी डेव्हिड हेडली या यंत्रणेच्या मदतीने सापडल्याचा दावा चुकीचा आहे. तो ब्रिटिश गुप्तचरांमुळे हाती आल्याचा दावा प्रोपब्लिका या शोध पत्रकारिताविषयक संकेतस्थळाने केला आहे.
दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी किंवा उघडकीस आणण्यासाठी टेहळणी कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी हेडलीच्या अटकेचा दाखला वारंवार दिला आहे. मात्र ब्रिटिश गुप्तचरांच्या माहितीनंतरच हेडली हाती लागल्याचे ‘प्रोपब्लिका’ने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय गुप्तचर संचालक जेम्स क्लॅपर आणि केथ अलेक्झांडर यांनी हेडली हा टेहळणी कार्यक्रमातून जेरबंद झाल्याचा दावा केला होता. काही सिनेटर्सनीदेखील याला दुजोरा दिला होता. यापूर्वी प्रोपब्लिकाने अमेरिकेतील दहशतवाद प्रतिबंधक यंत्रणा कोलमडल्याने हेडलीला मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करता आल्याचे दाखवून दिले होते. हेडलीच्या कृत्यांनी सावध होऊन कृती केली असती तर कदाचित मुंबई हल्ला टाळता आला असता असे प्रोपब्लिकाने म्हटले आहे. व्यवस्थेला जोडण्याचे हे अपयश असल्याचे काही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा दावाही केला आहे.

Story img Loader