वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीतच उभय नेत्यांमध्ये संघर्ष झाला. रशियाशी करारात युक्रेनला मनते घ्यावे लागेल असा इशारा ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना दिला.

तत्पूर्वी झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना आमच्या राष्ट्रातील मृत्यू तांडवाला जबाबदार असणाऱ्यांशी तडतोड नको अशी मागणी केली. त्यांचा रोख रशियाकडे होता. युक्रेनला रशियापासून वाचविणे शांततेच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांच्याकडे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. त्यावर रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीचा करार अंतिम टप्प्यात आहे. यातून अमेरिका युक्रेनमधील दुर्मीळ खनिजे खरेदी करण्यासाठी करत असलेला करार न्याय असल्याचे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची संभावना हुकूमशहा म्हणून केली होती.

Story img Loader