भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लीना मणीमेकलाई यांच्या काली या माहितीपटावर देशभरात जोरदार टीका होताना दिसत आहे. लीना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केले होते. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान आगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. या माहितीपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेल्या कॅनेडियातील संग्रहालयाने माफी मागितली आहे. कॅनडातील टोरंटो येथील आगा खान संग्रहालयात या माहितीपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. सिगारेट आणि समलैंगिकतेसंदर्भातील ध्वजासह हिंदू देवीचे चित्रण करणार्‍या माहितीपटाच्या पोस्टरमुळे वादाला तोंड फुटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांच्या वृत्तानुसार, आगा खान संग्रहालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. टोरंटो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आगा खान संग्रहालयात झाले. कलेच्या माध्यमातून आंतरसांस्कृतिक समज आणि संवाद वाढवण्याच्या संग्रहालयाच्या ध्येयाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणजे विविध धार्मिक अभिव्यक्ती आणि समुदायांच्या श्रद्धांचा आदर करणे आहे. ‘अंडर द टेंट’ प्रकल्पांतर्गत संग्रहालयात सादर केलेल्या १८ छोट्या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये कालीमातेचे अपमानास्पद सादरीकरणाने नकळतपणे हिंदू आणि इतर धार्मिक समुदायांचा अपमान झाला आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ –

Kaali poster row: शीर धडावर हवंय ना? अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

त्याआधी, ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी काली या लघुपटाशी संबंधित सर्व आक्षेपार्ह साहित्य काढून टाकण्याचे आवाहन कॅनडाच्या अधिकाऱ्यांना केले होते. कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तेथे प्रदर्शित करण्यात आलेल्या माहितीच्या पोस्टरमध्ये हिंदू देवतेचे अपमानास्पद चित्रण केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उच्चायुक्तालयाने हे पाऊल उचलले.

स्वतःच्या मामाशी लग्न ते आईचं उपोषण; वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिल्यात लीना मणीमेकल

अयोध्येतील साधूची लीना मणीमेकलाईना धमकी

देशभरातून निर्मात्या लीना यांच्यावर टीका होत असताना अयोध्येतील एका महंतांनी लीना मणीमेकलाई यांना धमकी दिली आहे. अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी लीना याचे शीर धडापासून वेगळे करण्याची धमकी दिली आहे. “नजीकच्या घटना बघा. जेव्हा नुपूर शर्माने योग्य गोष्ट सांगितल्यावर भारतभर, जगभर आग पेटली. पण तुम्हाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे का? तुम्हालाही तुमचे डोके तुमच्या शरीरापासून वेगळे करायचे आहे का? तुम्हाला हेच पाहिजे आहे का?” असे महंत राजू दास यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over kaali poster canadian museum apologizes for hurting hindu faith abn