नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींनी मुर्मूंचा ‘बिचारी महिला’ असा उल्लेख करून नाहक राजकीय वाद ओढवून घेतला. सोनियांच्या या शब्दप्रयोगाने शुक्रवारी भाजपला काँग्रेसविरोधात कोलित मिळवून दिले. ‘‘या राजघराण्याला आदिवासी महिला राष्ट्रपतीपेक्षा शहरी नक्षलवादी हा शब्द अधिक आकर्षक वाटतो’’, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबावर शरसंधान साधले. भाजपने केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर काँग्रेसने सोनियांच्या टिप्पणीवर बचावात्मक पवित्रा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंपरेप्रमाणे शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले. सुमारे तासभर झालेल्या भाषणाबाबत सोनिया गांधींनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना, ‘मुर्मू भाषण संपता संपता थकल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना बोलताही येत नव्हते. बिचारी महिला…’, असे विधान केले.

सोनियांच्या शेजारी उभे असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुर्मूंचे भाषण कंटाळवाणे होते का, काही प्रतिक्रिया द्यायची नाही का, असे सोनिया गांधींना विचारले.

त्यानंतर सोनियांनी मुर्मूंच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘बिचारी महिला’ असा उल्लेख केला. या उल्लेखाने शुक्रवारी राजकीय वादंग निर्माण झाला.

राष्ट्रपती कार्यालयाकडून निवेदन

सोनिया गांधींच्या विधानावर राष्ट्रपती कार्यालयानेही निवेदन प्रसिद्ध करत निषेध केला. काही प्रमुख काँग्रेस नेत्यांची टिप्पणी उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहे. या नेत्यांनी म्हटले आहे की राष्ट्रपती अभिभाषणाच्या अखेरीस खूप थकल्या होत्या आणि त्या बोलू शकत नव्हत्या. मात्र राष्ट्रपती भवन स्पष्ट करू इच्छिते की, ही टिप्पणी वस्तुस्थितीला धरून नाही. राष्ट्रपती अभिभाषणाच्या कोणत्याही टप्प्यावर थकलेल्या नव्हत्या. उपेक्षित समुदायांसाठी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे कधीही थकवणारे असू शकत नाही. कदाचित या नेत्यांनी हिंदीसारख्या भारतीय भाषांमधील वाक्प्रचार आणि भाषा यांची पुरेशी माहिती नसावी. त्यामुळे चुकीचा समज निर्माण झाला असावा. कोणत्याही परिस्थितीत अशी टिप्पणी निकृष्ट, दुर्दैवी आहे.

भाजप नेत्यांकडून हल्लाबोल

भाजपच्या नेत्यांनीही गांधी कुटुंबातील सदस्यांवर चौफेर हल्लाबोल केला. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचा ‘गरीब’ असा उल्लेख करणे हे उच्च पदाचा अपमान असून गांधी कुटुंबाच्या सरंजामी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. देशातील सर्वोच्च संवैधानिक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिलेची काँग्रेसने खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही, अशी टीका भाजप समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वरून केली.

काँग्रेस नेत्यांचा बचावात्मक पवित्रा

भाजप नेत्यांच्या आक्रमक टिकेनंतर काँग्रेस नेत्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. सोनिया गांधींना राष्ट्रपतींबद्दल अत्यंत आदर आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे प्रियंका गांधी-वाड्रा म्हणाल्या. माझी आई ७८ वर्षांची आहे. तिने फक्त एवढेच म्हटले की, राष्ट्रपती लांबलचक भाषण वाचून थकल्या असतील बिचाऱ्या. ती राष्ट्रपतींचा पूर्णपणे आदर करते, असे प्रियंका गांधी पत्रकारांशी बोलताना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद सदस्यांना उद्देशून भाषण केले. पण राजघराण्यातील एका सदस्याला त्यांचे भाषण कंटाळवाणे वाटले, तर दुसऱ्या सदस्याला त्यांची भाषा थकवणारी वाटली. हा केवळ राष्ट्रपतींचा अपमान नव्हे तर देशातील गरिबांचा आणि १० कोटी आदिवासींचा अपमान आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान