कच्च्या खाद्यतेलावरील आयात करात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती १.११ रुपयाने वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली़ सध्या कच्च्या खाद्यतेलावरील आयात कर शून्यावरून वाढवून आता २.५ टक्के करण्यात आला आह़े मात्र शुद्ध तेलावरील कर पूर्वी इतकात म्हणजेच ७.५ टक्के ठेवण्यात आलेला आह़े याबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर यांनी २३ जानेवारीपासून लादण्यात आलेल्या करामुळे खाद्यतेलाच्या किमतीत १.११ रुपये प्रतिकिलो वाढ होणार असल्याचे सांगितल़े मात्र कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात यापेक्षा अधिक वाढ करण्याचे सध्या तरी प्रस्तावित नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केल़े
दरम्यान, सॉलव्हेंट एक्स्ट्रक्टोर असोसिएशन (एसईए)या औद्योगिक संघटनेने शुद्ध तेलावरील न्यूनतम आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली आह़े आणि पामोलीन तेलावरील आयात शुल्कात ७.५ ऐवजी १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मागणी केली आह़े स्थानिक तेल शुद्धीकरण उद्योगांना तग धरण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आह़े
खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता
कच्च्या खाद्यतेलावरील आयात करात वाढ झाल्याने खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती १.११ रुपयाने वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली़ सध्या कच्च्या खाद्यतेलावरील आयात कर शून्यावरून वाढवून आता २.५ टक्के करण्यात आला आह़े मात्र शुद्ध तेलावरील कर पूर्वी इतकात म्हणजेच ७.५ टक्के ठेवण्यात आलेला आह़े
First published on: 06-03-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooking oil may be costlier due to recent import duty hike