छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावर तब्बल ४५ लाखांची रोख रक्कम सापडली. यानंतर कर्मचाऱ्याने आपल्यातील प्रामाणिकपणा दाखवत ही रक्कम स्थानिक पोलीस ठाण्यात जमा केली. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबर सिन्हा नवा रायपूर येथे कर्तव्यास आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “निलंबर सिन्हा यांना माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला ही बॅग सापडली. बॅग तपासली असता त्यांमध्ये ४५ लाख रुपये होते. सर्व २००० आणि ५०० च्या नोटा होत्या. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि बॅग सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जमा केली”.

निलंबर सिन्हा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनने हे पैसे नेमके कोणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी तपास सुरु केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.