अनंतनाग जिल्ह्य़ात दहशतवाद्याने एका पोलिसाची हत्या करून त्याची बंदूक चोरून नेली. या गोळीबारात एक नागरिक जखमी झाला. सलमतुल्ला असे मृत पोलिसाचे नाव आहे. गस्तीपथकातील या पोलिसावर काही दहशतवाद्यांनी जवळून गोळ्या झाडल्या. या घटनेची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही.
दरम्यान पुंछ जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे पाकिस्तानने पुन्हा उल्लंघन केले आहे. भारतीय ठाण्यावर तसेच नागरी भागात पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय सैन्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले, तर सांबा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यात चिनी बनावटीच्या पाच पिस्तुलांचा समावेश आहे. शोधमोहीम सुरू असताना गगवाल सीमेनजीक पोलिसांना हा तळ आढळला. यावेळी मोठय़ा प्रमाणात स्फोटके आढळली. मात्र ही स्फोटके खराब असल्याने हा तळ जुना असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Story img Loader