बिहारमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवर तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी छापरा-सिवान मार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतरचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दुचाकीवरील एकजण आगीत होरपळत असताना पोलीस मात्र पाहत उभे होते.

बसने धडक दिल्यानंतर दुचाकी जवळपास ९० मीटरपर्यंत फरफटत गेली होती. यावेळी दुचाकीवरील एकजण बसच्या खाली जाऊन अडकला होता. दरम्यान, इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागली. यामुळे त्या दुचाकीस्वाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर बसमधून पोलीस कर्मचारी खाली उतरताना दिसत आहे. पण कोणीही त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वजण दुरुन त्याला आगीत होरपळताना पाहत होते.

जय प्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमातून ही बस परतत होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अपघाताचे व्हिडीओ समोर आले असून यामध्ये एक मृतदेह बसखाली जळताना दिसत आहे, तर दोन मृतदेह रस्त्यावर पडले होते.

Story img Loader