Coromandel Express Accident News : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला रवाना झाला होती. आज ( २ जून ) ओडिशातील बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरा-समोर आली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून खाली घसरले. ही माहिती मिळताच बचावकार्यचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं.

स्थानिकांच्या मदतीने पथकांकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेरूळ रिकामा करण्याचं काम सुरु आहे. ५० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीचएसी, खांटापाडा पीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अपघाताचं कारण काय?

एकाच रूळावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोर आल्याने हा अपघात झाला आहे. सिग्नलच्या तांत्रिक कारणामुळे मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader