देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या जवळपास आढळत आहे. मंगळवारी देशात ३८ हजार ३५३ करोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झालायं. सध्या देशात ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहे. गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९७.४५ टक्क्यांवर आहे.

गेल्या २४ तासांत ४० हजार १३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १२ लाख २० हजार ९८१ झाली आहे. दरम्यान, आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट २.३४ टक्के असून दिवसाचा पॉझिटीव्हीटी रेट २.१६ टक्के आहे. गेल्या १६ दिवसांपासून पॉझिटीव्हीटी रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, गेल्या २४ तासांत ४१ लाख ३८ हजार ६४६ जणांचं लसीकरण झालं असून एकूण ५१ कोटी ९० लाख ८० हजार ५२४ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लशींचे ५३.२४ कोटी डोस पुरवले आहेत. तर, ७२ लाख ४० हजार २५० डोस लवकरच राज्यांना पुरवले जाणार आहेत. तर, सर्वच राज्यांकडे २.२५ कोटींपेक्षा जास्त डोस सध्या उपलबध आहेत.

आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ५१ कोटी ५६ लाख ११ हजार ३५ डोस वापरले गेले आहेत. यामध्ये वाया गेलेल्या डोसचाही समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.