करोना विषाणूचा जगभरात मोठा उद्रेक झालेला असताना देशातही याचा प्रभाव वाढतच आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. मात्र, प्रशासनाने वारंवार आवाहन करुन देखील लोक घराबाहेर पडत आहेत. राज्य शासन आणि पोलीस प्रशासन वारंवार जनतेचं याबाबत प्रबोधन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील एका समाजिक कार्यकर्त्याने दुचाक्यावर घराबाहेर पडणाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने प्रबोधनं केलं.
Moradabad: Vishesh Pal, a social worker, wears a #coronavirus-themed helmet & appeals to people who are out on the streets to stay at home, during the lockdown imposed to prevent spread of the disease. He says, “I appeal to people to stay at home to ensure safety of everyone”. pic.twitter.com/vxGcqT45Cp
— ANI UP (@ANINewsUP) April 4, 2020
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे विश्वेश पाल नामक एका सामाजिक कार्यकर्त्याने भन्नाट कल्पनेद्वारे लोकांचे प्रबोधन केले. पाल ने आपल्या डोक्यावर करोना विषाणूच्या थीमचे हेल्मेट घालून हातात एक फलक घेऊन लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
यापूर्वी चेन्नईच्या एका आर्टिस्टने करोना विषाणूची प्रतिकृती असलेलं एक हेल्मेट तयार केलं होतं. हे हेल्मेट डोक्यात घालून पोलिसंही रस्त्यावर लोकांचे प्रबोधन करताना दिसत होते. तर आंध्र प्रदेशात करोना विषाणूच्या चित्रामध्ये रंगवलेले घोड्यांवर स्वार होऊन लोकांचे प्रबोधन करीत होते. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारचे शक्य ते प्रयत्न केले जात आहेत.