देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शिवाय ओमायक्रॉनचं संकट देखील दाराशी येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या शाळांविषयी चर्चा सुरू झाली आहे. देशभरात देखील अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. अनेक पालक करोनाच्या भितीमध्ये मुलांना शाळेत पाठवण्यासाठी इच्छुक नसतात. शाळा सुरू होऊन देखील अनेकांनी अजूनही मुलांना शाळेत पाठवलेलं नाही. मात्र, यासंदर्भात देशातील आघाडीच्या विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मला वाटतं की आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवायला हवं. सामान्यपणे लहान मुलांना करोनामुळे फारसा धोका नाहीये. त्याच्या इन्फेक्शनचा मुलांना धोका झाल्याचं दिसत नाही. शाळेत गेल्यास करोनाची लागण होण्याच्या अत्यल्प अशा धोक्यापेक्षा त्यांना वर्गांमधून किंवा शिक्षणामधून किंवा त्यांच्या मित्रमंडळींसोबत होणाऱ्या गप्पांमधून त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे”, असं डॉ. कांग यांनी म्हटलं आहे.

kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक
hmpv in childrens
‘HMPV’मुळे लहान मुलांना होऊ शकतो गंभीर आजार? तज्ज्ञ काय सांगतात? भारतातील स्थिती काय?
Two children in Nagpur infected with HMPV news
नागपुरात दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’? गडचिरोलीत चार संशयित रुग्ण, नमुने तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये
Richa Chadha
मुलाला योग्यप्रकारे वाढविण्याची जबाबदारी स्त्रियांची का असते? रिचा चड्ढा गिझेल पेलिकॉटचे उदाहरण देत म्हणाली…
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
metapneumovirus in china
करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार; ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे? याचा भारताला धोका किती?

“सुदृढ बालकांना धोका नाही”

दरम्यान, सुदृढ बालकांना करोनाचा धोका नसल्याचा दावा डॉ. कांग यांनी केला आहे. “लहान मुलांमध्ये सुदैवाने करोनाचा धोका फारसा गंभीर नाही. दीर्घकाळ करोना किंवा एमआयएससीसारख्या अतीदुर्मिळ व्याधींचा धोका असतोच. पण व्यापक प्रमाणावर पाहिलं, तर सुदृढ बालकांना करोनाचा धोका नाही”, असं डॉ. कांग म्हणाल्या आहेत.

ओमायक्रॉन किती गंभीर?

डॉ. कांग यांनी एएनआयशी बोलताना ओमायक्रॉनच्या गांभीर्याविषयी देखील भूमिका मांडली. “सुदैवाने आपल्यासाठी ओमायक्रॉन करोनाच्या इतर व्हेरिएंट्सएवढा धोकादायक नाही. कदाचित आपली लोकसंख्या अशा अनेक विषाणूंसाठी सरावली आहे किंवा व्यापक प्रमाणावर आपल्याकडे लसीकरण झालं आहे. त्यामुळे आशा आहे की डेल्टाप्रमाणे ओमाक्रॉन चिंतेचा विषय ठरणार नाही”, असं त्यांनी नमूद केलं.

“करोना विषाणूसोबत जगणं शिकायला हवं”

दरम्यान, करोना विषाणूसोबत जगणं आता लोकांनी शिकायला हवं, असं डॉ. कांग यावेळी म्हणाल्या. “मला वाटतं आता हे स्पष्ट झालंय की आपल्याला करोनासोबत जगणं शिकायला हवं. यापुढेही येणाऱ्या करोनाच्या अनेक व्हेरिएंट्ससोबत जगण्याचीही आपली तयारी असायला हवी. कारण हा असा विषाणू आहे, जो वेगाने म्युटेट होतो”, असं त्या म्हणाल्या.

Covid-19 Vaccines for Children’s : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

“आपल्यासाठी जमेची बाब ही आहे की आपण दोन वर्षांपूर्वी होतो, त्याच परिस्थितीत आज नाही आहोत. आता आपल्याकडे करोनाचा सामना करण्यासाठी अनेक साधनं आहेत. चाचण्यांचा वापर कसा करायचा याची चांगली समज आहे. कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कामी येतील, त्यांचा वापर कसा करायचा, लसी कशा तयार करायच्या हे आपल्याला माहिती आहे. ते फार उपयुक्त आहे”, असं देखील डॉ. कांग यांनी स्पष्ट केलं.

यातून होणारे आजार किती गंभीर आहेत, हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असल्याचं डॉ. कांग यांनी सांगितलं. “आपण असा विचार करता कामा नये की दोन वर्षांपूर्वी होत्या, तशाच गोष्टी आत्ताही गंभीर असतील. कारण तो आपला या विषाणूचा पहिला अनुभव होता. आपल्यासाठी जास्त महत्त्वाची बाब म्हणजे यातून होणारे आजार किती गंभीर आहेत. त्यामुळे जसदसे नवे व्हेरिएंट येतील, आपण या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं”, असं डॉ. कांग म्हणाल्या

“तिसरी, चौथी, पाचवी लाटही असणार”

दरम्यान, अशा प्रकारचे विषाणू परत फिरून येत राहतात, असं त्या म्हणाल्या आहेत. “सगळ्यात महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की करोनाची तिसरी, चौथी, पाचवी लाटही असणार आहे. जेव्हा तुम्ही अशा विषाणूशी लढा देत असता, जो वेगाने पसरतो, तेव्हा असे विषाणू फिरून फिरून पुन्हा पुन्हा येत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे”, असं डॉ. कांग यांनी सांगितलं.

Story img Loader