गेल्या काही दिवसांत देशातील करोना बांधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभुमिवर केंद्राने आज राज्यांची आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत देशातील करोना संसर्गाची स्थिती, लसीकरण याचा आढाव घेण्यात आला. यामंध्ये राज्यातील आरोग्यमंत्री, सचिव सहभागी झाले होते. करोना संपलेला नाही, तेव्हा करोनाबाबत आखलेल्या नियमांची आणि लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना केले.

करोना बाधित रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध आणि करोना विषाणूच्या जनुकीय क्रमानिर्धारणाकडेही लक्ष ठेवावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. विशेषतः काही राज्यांत करोना बाधितांची संख्या वाढत असल्याबद्द्ल आवश्यक पावले उचलण्याच्या सुचना यावेळी मनसुख मांडवीय यांनी केल्या. यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकताहीव्यक्त केली.

“निर्बंध जरी हटवण्यात आले असले तरी जे करोनाबाबतचे नियम लागू आहेत त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यात यावे. विशेषतः परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या, आरोग्य सुविधा, लसीकरण याकडे लक्ष द्या”, असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Corona Cases करोनाचा टक्का वाढला; सलग तिसऱ्या दिवशी देशात ८ हजारपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद

हर घर दस्तक मोहिम, १२ ते १७ वयोगटाचे लसीकरण, १८ ते ५९ वयोगटासाठी वर्धक लस, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण यावर भर द्यावा अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना या बैठकीच्या माध्यमातून केल्या. तसंच करोनाच्या लसी या वाया जाणार नाही याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Story img Loader