करोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला आहे. वुहानमध्ये गेल्या काही दिवासात करोना रुग्ण वाढू लागले आहेत. करोनाचं संकट पाहता प्रशासनाने चाचण्यावर भर दिला आहे. वुहानमधील १.२ कोटी लोकसंख्येपैकी १.१ कोटी नागरिकांची चाचणी झाली असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चार दिवसात वुहानमध्ये ९० टक्के लोकांची करोना चाचणी झाली आहे. वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर करोनाचा संपूर्ण जगात फैलाव झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हुबेई प्रातांत ४७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ३१ प्रकरणं संसर्गजन्य आहे. वुहानमध्ये ६ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ६४ जणांमध्ये कोणतीच लक्षणं नाही. या सर्वांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. चीनमध्ये शुक्रवारी १३९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा एकूण आकडा ९३ हजार ६०५ इतका झाला आहे. तर करोनामुळे ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ४४४ जणांवर उपचार सुरु असून ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

कावेबाज चीन! अरुणाचल सीमेजवळ चिनी सैनिक बुलेट ट्रेननं पोहोचलं

चीनची करोना लस अकार्यक्षम?

चीनमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने चीन निर्मित लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटवर ही लस अकार्यक्षम असल्याचं बोललं जात आहे. त्यात किती जण लस घेऊनही संक्रमित झाले आहेत, याबाबतची माहिती नाही. दुसरीकडे दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी चीनची लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.