करोनाची दुसरी लाट आता मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. त्यात करोनाचा वेग मंदावल्याने पुन्हा शाळा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असं असलं तरी करोनाचा धोका पाहता पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. करोना लस घेतल्यानंतर मुलांना शाळेत पाठवू, असं काही पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही सप्टेंबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु होईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पालकांपुढे कोणते पर्याय आहेत, याची चाचपणी केली जात आहे.

कोव्हॅक्सिन- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचं लहान मुलांवर सध्या ट्रायल सुरु आहे. त्याचा निकाल सप्टेंबरपर्यंत येईल असं एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

जायडस कॅडिला- जायडस कॅडिलाने १२ ते १८ वयोगटातील डीएनए आधारीत करोना लसीचं क्लिनिकल ट्रायल नुकतंच पूर्ण केलं आहे. लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे.

मुलीचा प्रियकर थेट घरात आल्याने संताप, कुटुंबीयांनी हत्या करुन गुप्तांग कापलं; तरुणाच्या कुटुंबाने केलं असं काही…

फायजर- फायजर-बायोएनटेकच्या लसीही प्रतिक्षेत आहेत. भारताकडून मान्यता मिळाल्यास हा पर्यायही उपलब्ध होणार आहे. मॉडर्ना आणि फायजर भारतात लसीचा पुरवठा करण्यापूर्वी इंडेम्निटी क्लॉज करण्यावर जोर देत आहे.

Tokyo 2020 : ऑलिम्पिकची तयारी सोडून झाला करोनायोद्धा, तरीही जिंकलं सुवर्णपदक!

मॉडर्ना- यूरोपमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुलांना मॉडर्ना लस देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीचे दोन डोस असणार आहेत. या लसीचं ३ हजार ७३२ मुलांवर परीक्षण करण्यात आलं आहे.

 

Story img Loader