रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़

करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडय़ात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली़  गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळल़े दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले’’ याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आह़े ‘‘करोना

 रुग्णवाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले  सार्वजनिक आरोग्य संकटाला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी,’’ असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आह़े

सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत, असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आह़े करोना नियंत्रणाबरोबरच नागरिकांचे जीवन आणि उपजीविकेवरील करोनाचा दुष्परिणाम कमीतकमी असेल, यावर भर देण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार राजेश भूषण यांनी या पत्रात केला़

राज्यात करोनाचे २,७४८ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात बुधवारी करोनाचे २७४८ नवे रुग्ण आढळले, तर ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई २५५, नाशिक ८५, नगर २८०,

पुणे मनपा ३७६ पिंपरी-चिंचवड १३९, नागपूर ३५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २७,४४५ आहे.

आसाम, हरियाणा निर्बंधमुक्त

आसामपाठोपाठ हरियाणाने करोना निर्बंध पूर्णत: मागे घेतल्याची घोषणा बुधवारी केली़  आसाम मंगळवारपासून निर्बंधमुक्त झाले आह़े  करोना निर्बंधमुक्त झालेले ते पहिले राज्य ठरल़े  त्यापाठोपाठ हरियाणानेही करोनासंबंधी सर्व निर्बंध मागे घेत असल्याचे स्पष्ट केल़े  मात्र, अंतरनियम पालन आणि मुखपट्टीचा वापर सुरूच ठेवावा, अशी सूचना हरियाणा सरकारने नागरिकांना केली़

‘पंचसूत्री मात्र पाळा’

निर्बंध हळूहळू कमी करताना करोना प्रतिबंधासाठी चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि नियम पालन या पंचसूत्रीवर भर देण्याची गरज केंद्राने अधोरेखित केली़  रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा दैनंदिन आढावा घेण्याची सूचनाही केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona restriction centeral government daily patient numbers akp
Show comments