देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ३५३ जणांना करोना संसर्ग झाला असून एकूण रुग्णांची संख्या आता ३ कोटी २० लाख ३६ हजार ५११ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या १४० दिवसात प्रथमच नीचांकी पातळीवर गेली असून ती ३ लाख ८६ हजार ३५१ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मृतांची संख्या ४९७ ने वाढून ती ४ लाख २९ हजार १७९ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांच्या १.२१ टक्के म्हणजे मार्च २०२० नंतर नीचांकी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.८५ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत २१५७ ने घट झाली असून आतापर्यंत एकूण ४८ कोटी ५० लाख ५६ हजार ५०७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.१६ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या १६ दिवसात तो तीन टक्क्यांपेक्षा कमीच आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की साप्ताहिक रुग्णवाढीचा दर आता २.३४ टक्के झाला आहे. करोनातून बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी १२ लाख २० हजार ९८१ झाली आहे. मृत्यू दर १.३४ टक्के झाला. एकूण ५१.९० कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ४ लाख २९ हजार १७९ जणांचे मृत्यू झाले आहेत.

Story img Loader