ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असून १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर – बायोएनटेक लशीची पहिली मात्रा देण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात केली जात आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले की, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला मान्य करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल. लसीकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने जी शिफारस करण्यात आली त्याचे आम्ही स्वागतच करीत आहोत. लसीकरणाचा हा कार्यक्रम काळजीपूर्वक व यशस्वीपणे राबवण्यात येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in