लस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, अग्रीम रक्कम मिळालेली नाही – भारत बायोटेक

ब्राझीलमध्ये भारत बायोटेक या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लशीच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून ते प्रकरण गाजत असतानाच ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिन खरेदी आदेश रद्द केला आहे.

ब्राझीलने आम्हाला अग्रीमाची कुठलीही रक्कम दिलेली नाही, असे भारत बायोटेक या लस निर्मात्या कंपनीने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन लस खरेदीत बरेच गैरप्रकार झाल्याचे ब्राझीलमध्ये उघड झाले आहे. सीजीयू ऑनलाइनवर असे कळवण्यात आले आहे की, कोव्हॅक्सिन खरेदी करार तात्पुरता रद्द करण्यात येत आहे. सीजीयूच्या प्राथमिक निष्कर्षानुसार खरेदीत गैरप्रकार झाले असून पुढील चौकशी होईपर्यंत खरेदी बंद करण्यात येत आहे, असे ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो क्विरोगा यांनी स्पष्ट केले आहे.

कोव्हॅक्सिन खरेदीसाठी ब्राझीलने भारत बायोटेकशी करार केला होता. त्यात दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या ब्राझीलमध्ये मोठे घोटाळे झाले असून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत यात कुठलीही टक्केवारी सरकारने मिळवलेली नाही, असा खुलासा ब्राझील सरकारने केला आहे. कोव्हॅक्सिन लस खरेदी बंद केल्यामुळे लसीकरणावर परिणाम होणार नाही.

भारत बायोटेक कंपनीने ब्राझीलने खरेदी आदेश रद्द केल्याच्या प्रकरणात कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. क्विरोगा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅनव्हिसा या ब्राझीलमधील औषध प्रमाणन संस्थेने अजून तरी कोव्हॅक्सिनला पूर्ण परवाना दिलेला नाही.

लस आयातीसाठी दबाव

लस खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात अध्यक्ष बोलसेनारो यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. आरोग्य खात्यातील आयात विभागाचे प्रमुख लुईस रिकार्डो मिरांडा यांनी व त्यांचे बंधू लुईस मिरांडा यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिन लस आयात करण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला.

सिंगापूरमधील कंपनीमार्फत यासाठी ४५ दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. नंतर याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचे दोघांनी म्हटले होते पण ती करण्यात आली नाही, असे असले तरी या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून त्याबाबत काही सांगण्यास नकार देण्यात आला.

भारत बायोटेक या कंपनीने काही चुकीचे केले नसल्याचे सांगत इमेल निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रमाणित पद्धतींचे अनुपालन केले आहे. कंपनीने पैशांचे व्यवहार सिंगापूरमधील कंपनीच्या माध्यमातून कसे केले याबाबत काही सांगितलेले नाही. या घोटाळ्यामुळे बोलसेनारो यांच्या विरोधातील गटांना आयते कोलित मिळाले असून देशव्यापी निदर्शने शनिवारपासून सुरू होणार आहेत.

Story img Loader