लंडन : लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये शनिवारी झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला. पावसाळी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे, चार्ल्स यांच्या मातोश्री, राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांपूर्वी झालेल्या राज्याभिषेकाच्या आठवणी जाग्या झाल्या.
‘गॉड सेव्ह दि किंग’चा उद्घोष, चर्चच्या घंटा आणि ट्रम्पेट वाजत असताना ७४ वर्षे वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना ३६० वर्षे जुना ‘सेंट एडवर्डस क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला.
राजे चार्ल्स व राणी कॅमिला हे नंतर पारंपरिक पोशाख परिधान करून बकिंगहॅम राजवाडय़ाच्या सज्ज्यात आले. त्यांच्या सोबत राजपुत्र व राजपुत्री वेल्स, विल्यम व केट आणि मोजके राजनिष्ठ लोक होते. नव्याने अनभिषिक्त सम्राट- सम्राज्ञीची झलक पाहण्यासाठी पावसाची पर्वा न करता अनेक तास वाट पाहात थांबलेल्या हजारो नागरिकांना या सर्वानी अभिवादन केले.
या ऐतिहासिक सोहळय़ाचा भव्य समारोप रॉयल एअर फोर्सच्या फ्लायपास्टने करण्याचे नियोजन होते, मात्र सर्द वातावरणामुळे हा कार्यक्रम थोडक्यात आटोपण्यात आला. लष्करी वाद्यवृंद ब्रिटनचे राष्ट्रगीत वाजवत असताना गर्दीने जल्लोष केला.
यापूर्वी, जवळजवळ एक हजार वर्षांची परंपरा असलेला दोन तासांचा धार्मिक समारंभ पावित्र्य राखून साजरा करण्यात आला. राजे चार्ल्स यांनी आर्चबिशप ऑफ कँटरबरी यांच्यासमोर ‘सेवेची शपथ’ (ओथ ऑफ सव्र्हिस) घेतली. या पवित्र समारंभाचा भाग म्हणून चार्ल्स व कॅमिला यांनी प्रतीकात्मक पुनर्विवाह केला. मे १९३७ मध्ये राजे पाचवे जॉर्ज व राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरल्या गेलेल्या खुर्च्याच याही राज्याभिषेकासाठी वापरण्यात आल्या. ब्रिटनमधील आतापर्यंतचे सर्व राज्याभिषेक सोहळे वेस्टमिन्स्टर अॅबेमध्येच झाले आहेत.